जयहिंद मित्रानो जयहिंद
आपला देश, समाज कुटुंब या व्यवस्थामध्ये राहत असताना आपल्याला अनेकदा आपल्या व्यक्तीगत ,सार्वजनिक अशा दोन्ही पध्दतीने आपलं जीवन प्रवास चालू असतो आपण व्यक्तीगत आयुष्य जगत असताना खर तर प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते आपलं कुटूुंब सुरक्षित राहीले पाहिजे आपल्या कुटुंबाला सर्व सोयीसुविधा अगदी वेळेवर मिळायला हव्यात यासाठी आपण नेहमीच संघर्ष करीत असतो का तर आपलं कुटूंब आहे म्हणून; मग मित्रानो आपण आपल्या कुटुंबावर प्रेम करतो म्हणजेच आपण आपल्या घरातील लोकांबरोबर आपुलकीने राहत असतो हीच खरी आपल्या नात्याचा आदर, जिव्हाळा असतो.
मित्र हो सार्वजनिक आयुष्य जगत असताना आपल्या समाजात देशात काय चालू आहे याचं कधी आपण विचार करतो का? करत असाल तर खूपच छान पण अजून पर्यंत विचार केला नसेल तर आज पासून आपण आपल्या देशाचा , समाजाचा फक्त विचार करून नव्हे तर मी या देशाचा ,समाजाचं, निसर्गाचं देखील माणूस या नात्याने काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून आपल्याला सार्वजनिक जीवनप्रवासात आपण एक आहोत ही भावना रुजणे , बिंबविणे फार गरजेचं आहे आपण एकीची भावना आपल्यात जागरूक झाली तर आपल्या देशावर येणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगावेळी आपण सर्व एकत्र येऊन सकारात्मक विचार करून आपल्या देशाला या संकटातून नक्कीच बाहेर काढू शकतो.
सामाजिक बांधिलकी जपणे आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे वेळोवेळी आपण प्रत्येकाने नैतिक जबाबदारी पार पाडणे गरजेच आहे परमेश्वराने या जगाची जबाबदारी माणसंवर दिलेली तर आपली स्वतःची जबाबदारी ओळखून आपल्या क्षमतेनुसार उपलब्धतेनुसार बंधीलकीची भावना जपणे म्हणजेच समाजभान होय आपण सर्वजण आपल्या देशाचे जागरूक,कर्तव्यदक्ष, जबाबदार नागरीक आहोत यात शंका नाही पण या नागरिकाच कर्तव्ये मात्र आपण गांभीर्याने पार पाडत नाही असं का आपलं देशावर प्रेम नाही आहे का? असेलतर आपण आपल्या पाठ्य पुस्तकातील मूल्ये फक्त वाचायला आवडतात का तर मूल्यशिक्षणा मधील मूल्याचा वापर का करीत नाही तर अशा वेळी आपली ही मूल्ये यांचा विचार करून कृतीमध्ये जर आणली तर आपल्या अडचणीवर नक्कीच मात करू शकतो आपल्या कर्तव्यदक्ष नागरिकांचे आद्यकर्तव्य पार पाडू शकतो.
म्हणूनच आपण आपलं आयुष्य जगत असताना वेळोवेळी व्यक्तीगत,सार्वजनिक गोष्टीचा योग्य विचार करून आपलं जीवनप्रवास करायचा आहे आपल्या देशाला सर्वगुणसंपन्न बनवायचं आहे आपली देशाची सर्वश्रेष्ठ प्राचीन अशी संस्कृती आपल्याला जपायची आहे.
अतुल विष्णू गायकवाड