संपत्तीचा संचय करण्याचं रहस्य शिका

जो कुणी त्याच्या परिश्रमाने आणि कठोर कष्टाने संपत्ती कमावतो, तो त्याच्या प्रत्येक पैशाचं मूल्य जाणतो.

संपत्तीचा संचय करण्याचं रहस्य शिका

एक श्रीमत असा शेतकरी होता ज्याच्याकडे कैक एकर शेती होती. आणि बँकेमध्येही बरेच पैसे साठवलेले होते. प्रचंड परिश्रम आणि निर्णयशक्ती यांच्या साहायाने त्याने त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर संपती कमावली होती. अनेक लोकाचा प्रेरणादायक म्हणून तो अतिशय प्रसिद्ध होता एकदा एक पत्रकार आपल्या वर्तमानपत्रासाठी त्याच्यावर लेख लिहून लोकांना परिचय करून द्यावा म्हणून त्याच्याकडे मुलाखत घ्यायला गेला "सर, आम्हाला आपल नाव आणि आपली प्रसिद्धी यांचं रहस्य ऐकायला आवडेल. पण तत्पूर्वी तुम्ही एवढी संपत्ती कशी काय जमवली हे वाचकांना सांगाल काय

त्या उत्सुक पत्रकाराला ते रहस्य उलगडून सांगण्यासाठी त्या शेतकऱ्याला एक वाक्यही लागल नाही.

ती फार मोठी कथा आहे. पण सुरुवातीला आपण एक लहानशी गोष्ट समजून घेऊ. तुम्ही हे काही दिवे का विझवून टाकत नाही, तेवढीच विजेची बचत होईल ?" शेतकरी म्हणाला.

जो कुणी त्याच्या परिश्रमाने आणि कठोर कष्टाने संपत्ती कमावतो, तो त्याच्या प्रत्येक पैशाचं मूल्य जाणतो. ते जे काय कमावतो, त्यातला प्रत्येक पैसा ते वाचवतात. ते बचतीच्या बाबतीत अत्यंत दक्ष असे असतात आणि ते कुठे पैसा वाया तर घालवत नाही ना, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवतात. ते जे काय बचत करतात, ते पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवतात आणि मग ती संपत्ती चांगल्या पद्धतीने वाढत जाते