तुला कधी काही मागितलं नाही रे ,
पण आता तु वेळ आणली रे गणराया..
डोळ्यातलं थेंब सुद्धा सुकेणा पाहताना पिकाला
तुझ्या डोळ्या समोर पिकाच्या झाल्या र लाह्या...
रडता नाही येत रे त्या पोशिंदयाला,
घोर लागुन राहिलाय र त्याच्या जिवाला ,
होतं नव्हतं टाकुन बसला तो मातीत
आता त्यानी फास लावाव का र गळ्याला...
जातो पाऊस पोळयाला येतोच म्हणी,
त्यानी ही पाठ फिरवली ,धान लागल र सुकाया
तुझीचं आस होती र फक्त बाप्पा,
ओल्या पावलानी येशील तू अश्रु पुसाया
काही चुकल असलं तर त्याची चूक पोटात घे
गाई वासरा साठी तरी तू आता मन मोकळं बरस रे,
तू अशी पाठ फिरवली तर कोन त्याचं वाली
त्यांच्या नशीबात दुःख, मंग कसली आली दिवाळी..
त्यांच्या लेकरांबाळा साठी तरी कृपा कर
नद्या नाले होउदे एक तुडुंब होउ दे पाण्याने
हें गणाराया आता तुला च फक्त मागणं रे
होऊदे आनंद सगळ्यांना तुझ्या गोड येण्याने...!
ती जमलेली गर्दी आज बरंच काही सांगत होती,
सोडून गेलेली नातीही आज कौतुक करत होते.
कशासाठी होत असेल हा आज खोटा खोटा सोहळा
जिवंतपणी इथे कुणी फिरवला नाही डोळा...
तो आज आडवा झोपला होता म्हणून दुनिया सरळ होती,
तो उभा असताना त्याच्या जीवनाची झाली होती माती.
त्याच्या शेवटच्या वाटेत नाण्याचा खळखळातट होता
मात्र चालणाऱ्या वाटेत त्याच्या काट्यांचा सुळसुळाट होता.
आयुष्यभर टोचत राहिलेला गुलाब काटा आज थकला होता
म्हणूनच की काय आज गुलाब त्याच्या साठी सजला होता
लाह्या मुरमुऱ्याच जीवन त्याचं जिवंतपनी पसरल होतं.
आज ही मरणासोबत ते पायंदळी विखुरलं होतं.
आयुष्यभर धुळीत लोळूण आज दिवा विझला होता,
आज मात्र चिता पेटताना गावराण तुपात तो भिजला होता,
हालअपेष्टा सहन करत एरंड त्याचं बनलं होतं,
चंदनामध्ये जळतांना आतूनच पोकळ भासत होतं.
आयुष्याची घडी बसवता बसवता त्याचीच यात्रा निघाली
घडवता घडवता त्याचीच मडकी अरध्यातच फुटली
जिवंत असता नाही दिला कुणीही आसरा
आज का मग मांडला हा खोटा खोटा पसारा...
या खोट्याच पसाऱ्याची मनात दाटते भिती,
या गर्दीतच हरवून गेली माझी अनामिक नाती...
हे माझं ते माझं करता करता एकटी अंतयात्रा निघाली
जिवंतपनी धुरकटलेली, आज मात्र उजळलेली..!
कु. रोहिणी पंडीत मोरे,
नाटेगाव, ता. कोपरगाव