नवशक्ती देवी स्कंदमाता

जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता नवशक्ती देवी स्कंदमाता

नवशक्ती देवी स्कंदमाता

कथा पुरानाची
नि स्कंद मातेची,
बाळ कर्तिकेची
नि पार्वतीची...

नवदुर्गेचे रूप
दिवस पाचवा,
ऐकू कथा एक
शौर्याचा काजवा...

ध्यान शंकराचे
भंगले मदन,
पार्वती सोबत
लाविले लगन...

स्कंद एक आला
कार्तिके रुपात,
तारकासुर नाश
कल्याण वधात...

मातेने सिंहस्थ
शिकवी होऊन,
शस्त्र, हत्याराचे
ज्ञान ते देऊन...

मारीला राक्षस
सृष्टीस तारून,
शौर्यशाली माता
स्कंदाची होऊन...

आपण घेऊया
वसा त्या शौर्याचा,
स्कंदमाता सम
पण औदार्याचा...

कथा आज ऐकुनी
माळ पाचवी ही,
भक्तीने भावाने
भरू विश्वासही...

जया विनायक घुगे - मुंडे

जया विनायक घुगे - मुंडे, 
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका 
गावंद रा,परळी वैजनाथ, बीड