शेतात राबराब राबून
घाम गळतो भराभर
पोटाच्या आधाराला
कोलिम आणि भाकर
चव हीची सर्वात भारी
खायला एक नंबर
तसा माझा आवडीचा पदार्थ
कोलिम आणि भाकर
जिभ भिजते पाण्यानं
बघताच समोर
गरीबाच हे मोठं ब्रँड
कोलिम आणि भाकर
तिखट मिरची आणि
त्यात कांद्याची भर
खायला आणखी चविष्ट
कोलिम आणि भाकर
कवी: स्वप्नील चंद्रकांत जांभळे
ता. दापोली, जि. रत्नागिरी,
मु.पो.शिरखळ,गाव. हातीप (तेलवाडी).