पायवाट ही ओळखीची
सदैव राहे संगतीची
दुःख प्रसंग आले किती?
तीच दाखवी मजवर खरी प्रीती
दुःखाचा भवसागर मजवर
आधार असे मज तिचा सत्वर
आतून मी अनेकदा खचून गेले
पायवाटेने माझे सांत्वन केले
सखी असे ती जीवाभावाची
साथी असे ती सुखदुःखाची
अनेक जण येती जाती
पायवाट ना लक्ष देती
वाटे मजला ती समदुखी
माझी जीवाभावाची सखी
कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहणे
पायवाट ना शोधी कसलेही बहाणे
राहणी तिची साधी सुंदर
झेलते ती घाव अपार
सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि.प. उच्च प्राथमिक शाळा,
गावंदरा, ता. धारूर, जि. बीड