हास्याच्या साम्राज्यात प्रवेश करा

जेव्हा तुम्ही हसता, तुम्ही आनंदी असता, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या मनामध्ये तिरस्कार, क्रोध, असूया आणि इतर नकारात्मक भाव नसतातच

हास्याच्या साम्राज्यात प्रवेश करा

गुरू जरा प्रसन्न मनस्थितीमध्ये होते, म्हणून त्यांच्या शिष्यांची अशी इच्छा झाली की ईश्वराचा शोध घेण्याच्या मार्गात त्यांना कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागेल, हे जाणून घ्यावे. त्याबद्दल शिष्यानी गुरूंना विचारले तेव्हा गुरु सांगू लागले,

‘‘देवाने मला प्रथम हाताला धरून कर्माच्या भूमीमध्ये नेले, जेथे मी बरीच वर्षे काढली’’, ते सांगू लागले, आणि देव पुन्हा आले आणि त्यांनी मला मला दुःखाच्या राज्यामध्ये नेऊन सोडले जिथं प्रत्येक अनिर्बंध आसक्तीने माझं हृदय अग्दी विटून जाईल, इतपत मी राहिलो. त्यानंतर प्रेमाच्या राज्यात नेण्यात आले मग कुठे मी स्वतःला प्रेमाच्या हाती सोपवले गेलेले पाहिले, ज्यामुळे माझ्यातील जे काही स्वतःचं असं उरले ते जळून गेले. मग त्यांनी मला असीम शांततेच्या प्रांतामध्ये घेऊन गेले. जिथं माझ्या काही तरी वेगळं शोधणाऱ्या डोळ्यांसमोर जीवन आणि मृत्यूची रहस्ये प्रकट झाली." "

"ही तुमच्या शोधाची अंतिम स्थिती होती का?” त्यांनी विचारलं. "नाही..”, गुरू म्हणाले, आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली...

एके दिवशी देव म्हणाले, "आज मी तुला देवळाच्या अगदी आतल्या गाभाऱ्यात नेणार आहे, अगदी साक्षात् ईश्वराच्या हृदयातच," आणि मला हास्याच्या राज्यात नेलं गेलं.

जेव्हा तुम्ही हसता, तुम्ही आनंदी असता, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या मनामध्ये तिरस्कार, क्रोध, असूया आणि इतर नकारात्मक भाव नसतातच. नकारात्मक भाव जेव्हा नसतात, तेव्हा प्रेम आणि करुणा उत्पन्न होते. आध्यात्मिकतेची ही अंतिम पायरी आहे. हे कुणालाही अगदी सहजपणे फक्त हसण्यातून साधू शकते.