अहंकारापेक्षा पश्चाताप केव्हाही चांगला

पश्चातापयुक्त चूक ही अहंकारी सद्गुणापेक्षा केव्हाही चांगली

अहंकारापेक्षा पश्चाताप केव्हाही चांगला

पूर्वे कडील एका सुलतानाची एक कथा आहे, जो रोज पहाटे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी उठायचा. एके दिवशी तो . रोजच्या प्रार्थनेच्या वेळेस जागा झालाच नाही. त्या दिवशी पहाटे सैतानाने त्याला उठवले आणि उठून प्रार्थना करण्याची आठवण करून दिली. "तू कोण आहेस?" सुलतानाने त्याला विचारलं. "मी कोण आहे, याला काही फारसं महत्त्व नाही, कारण केलेली कृती चांगली आहे." "होय, पण मला वाटते तू सैतान आहेस आणि तुझ्यासमोर नेहमीच काही वाईट हेतू असतात. मला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की तुला मला उठवावेसे का वाटले आणि मी प्रार्थना करावी, असे तुला का वाटले?" "ठिक आहे", सैतान सांगू लागला...

"जर तू झोपून राहिलास आणि तुझी प्रार्थना करण्याचं विसरून गेलास, तर तू त्यानंतर क्षमा मागशील आणि अशा पश्चातापाने देव जास्तच आनंदी होतो. पण तू जर असंच वागत राहिलास आणि पुढच्या दहा वर्षांमध्ये एकही प्रार्थना चुकवली नाहीस तर तू स्वतःच्याच कृत्याने खुश होशील, मग तू अहंकाररुपी पापाच्या गर्तेत पडशील आणि त्याचा मला जास्त आनंद होईल." सैतान म्हणाला.

पश्चातापयुक्त चूक ही अहंकारी सद्गुणापेक्षा केव्हाही चांगली !