आई जिजाऊ मराठी कविता

पूनम सुलाने लिखित मराठी कविता आई जिजाऊ

आई जिजाऊ मराठी कविता

करण्या रक्षण राष्ट्राचे
सोसुनी कष्ट जन्म बाळास देते
जेव्हा पुत्र होतो शिवाजी
तेव्हा आई जिजाऊ होते

स्वकर्तृत्वाच्या बळावरती
स्वराज्याची निर्मिती होते
पुत्र होता जनतेचा राजा
 राजमाता आई जिजाऊ होते

जिंकण्याचे ध्येय असणार्‍या
पंखामध्ये बळ विश्वासाचे भरते
कोवळ्या मनाच्या मातीमध्ये
संस्काराचे बी आई जिजाऊ होते

करण्यास विनाश शत्रूंचा 
त्याग सर्व सुखाचा करते
गोरगरीबांच्या हक्कासाठी
धार तलवारीची आई जिजाऊ होते

Poonam Sulane
पुनम सुलाने,जालना