विश्वंभर तू रे देवा! मराठी कविता Marathi Kavita

सोनाली रामलाल रसाळ लिखित आध्यात्मिक कविता, विश्वंभर तू रे देवा!

विश्वंभर तू रे देवा! मराठी कविता Marathi Kavita

नाही देखीले मी डोळा! देवा तुझे रूप!
बैठूनी समीप तुजला! राजसा न्याहाळीन!

विश्वंभर तू रे देवा! जग चालविसी!
देहाचा पसारा सारा! तूच सावरिशी!

नको नको म्हणता जीव! गुंते मोहजाळे!
सोड विठू येऊन तू! आत्म्याचे साखळे!

कैवारी तू पंढरीचा! तू दिनाचा सोयरा!
सापडले एकांत वनी! दे मज आसरा!

देह दंश होऊनी जरी! विष नोहे पांगले!
काळवंडले अवयव सारे! देह भान हरपले!

यातानेचा महापूर! सर्व वाहुनी नेईल!
तूच दिसे चोहीकडे! गुण तुझेच गायिल!

देहाचा करुनी पिंजरा! आत आत्मा कोंडीला!
हरिनामाचा मी वेड्या! चौकड डाव मांडीला!

Sonali Rasal

सोनाली रामलाल रसाळ,
कापूसवाडगाव, ता. वैजापूर, 
 जि. औरंगाबाद.