हरवल्यासारखं वाटतंय काहीतरी,
मन भरून येतंय पुन्हा पुन्हा,
पण का हे कळत नाही आज।।
उगीच त्रास मनाला होतोय
शब्द नाही सापडत बोलायला,
का समजत नाही आज।।
मन वेड्यासारखं भरकटतंय,
उगाच त्रास करुन घेतंय,
पण का माहित नाही आज ।।
त्रास होतोय खुप,
जखम जूनी जणू ठणकतेय,
पण का उमजतच नाही आज।।
ना अन्नाची भूक आहे,
ना समाधानाची झोप,
जगणंच माझं मला छळतंय आज।।
कशाची वाटतेय खंत,
का दाटतोय उमाळा,
काहीच कसं उलगडत नाही आज।।
हरवल्यासारखं वाटतंय काहीतरी,
मन भरून येतय पुन्हा पुन्हा,
का ते समजत नाही आज।।
जयश्री औताडे, गंगाखेड,
जि. परभणी