सोशिकतेचा सागर...

सहनशीलतेचा करूनेचा स्वाभिमानाचा सागर असणाऱ्या कांताला छळणं हाड उगाळून जा कांतीन त्यांचा संसार फुलवला टिकवला तिच्या डोळ्यात कायम अस्व भरण्याखेरीज...

सोशिकतेचा सागर...

बालपणीच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या कांताबाई बालवया पासून कष्ट करण्याची त्यांना जणू दैवानं शक्तीच प्रधान केली आपल्या मेहनतीवर जगण्याची त्यांना सवयचं जडली आपल्या आईबरोबर चिमुकल्या हाताने अनवाणी पायांनी कणसे विकून उदरनिर्वाहासाठी आईला हातभार लावत ,त्यामुळे व्यवहार ज्ञानात त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हते.

त्या काळच्या परिस्थितीनुसार सासरी अगदी गरिबी होती बेताची परिस्थिती पोपटराव लहरी माणूस "केलं नाहीत तेल लावीत गेलं "त्यामुळे घरची जबाबदारी कांतावरच येऊन पडली ज्या वयात मनसोक्त खेळायचं बागडायचं त्याच वयात संसाराचा गाडा ओढण्याचं कुकर्म त्यांना प्राप्त झालं शरीर व मन तयार नसतानाही परिस्थिती समोर ताठ मानेने लढण्यास तयार झाल्या भेटेल ते काम निडरपणे करणे एवढेच त्यांना माहीत होतं समोर उभ्या शत्रूचा फरशा पाडण्याचा विचार जसा सैनिकाच्या मनात तसाच परिस्थितीला धूळ चारण्याचा त्यांचा करारी बाणा चार भावंडांचा सामायिक कुटुंब कांता थोरली असल्याने तिनेच सासरी आपल्या गावांची आई होऊन बाळंतपणा उरकली तिच्याही संसार वेलीवर बघता बघता चार कळ्या उमलल्या या कळ्यांनी घर गजबजलं वातावरणात गंध दरवळला आणि त्याबरोबरच अविचाराने ही फेर धरला सासू सासऱ्यांचा तोंड काही गप्प बसलं नाही चार पण त्यांनी घर उजळलं पण कांताच्या जीवनात सासरवासाचा अंधार पसरला.

पोपटराव सोडून गेले कुठे गेले काय गेले काहीच पत्ता लागला नाही चार मुली व सारा भावंडांचा सांभाळ कांता करू लागली जावाही  तिच्या सोबतीला होत्या सहा महिन्यानंतर पोपटराव घरी आले पुन्हा पूर्ववत संसार सुरू झाला आणि सर्वांच्या मतानुसार नवस सायास करून मुलगा झाला बालवयात लग्नं होऊन पाच बाळंतपणात योग्य उपचार विधी न मिळाल्याने कांताला वाताने घेरले पण पोपटरावांना तिच्या दुःखाशी घेणे देणे नव्हते त्यांना फक्त बसून खाण्यात पुरुषत्त्वाचा तोरा मिरवण्यात समाधान इलाजासाठी पैसे नसल्याने कांताच्या भावाने कसा बसा इलाज केला आणि वातावर उपचार झाला कोणालाच दोष न देता जीवन संघर्ष करण्यास कांता पूर्ववत तयार झाली आणि कामाला जाऊ लागली. मुले लहान असल्याने कोणी कामही देत नसेल बाहेरचे काम सोडून घरीच धंदा करण्याचा सुविचार कांताला सुचला पतीला सांगून सुरुवात करायचे ठरले पण भांडवलाचा प्रश्न होता शेवटी तोही तिच्या भावानेच मिटवला तसा छोटासा उद्योग समोसा सेंटरचा श्री गणेशा झाला पण पोपटराव अत्यंत आळशी असल्याने माल तयार करून झाल्यावर अंग दुखीचा नाटक करून झोपत असत मग विक्रीला जाण्यासाठी त्यांचे हात पाय चेपून विनवणी करून कशा बशा कांताबाई त्यांना पाठवत असत हे सर्व सोपस्कार झाल्यावर रात्री दहा ते अकरा वाजता पोपटराव आले की ती माऊली त्यांना गरमागरम भाजी पोळी खाण्यासाठी करून देते पण ''कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडेच" पोपट रावांची शिव्यांची मालिका दणकावून चालत असे. आणि कांताबाई आपल्या अश्रूंचा अभिषेक धरणी मातेला घालत असतं हे नित्याचेचं ठरले होते ऐकून बहिरे आणि पाहून आंधळे अशी भूमिका त्यांनी स्वीकारली आपल्या पाच पांडवांसाठी दुःखाच्या माथ्यावर स्वार होऊन उद्याच्या सोनेरी पहाटेची आज त्यांच्या नयनाला लागलेली होती. पोपट रावांना फिरून माल विकणे जमले नाही ,हात गाडीतही यश आले नाही, मेडिकल वरही निभाव लागला नाही, कधी मुलांची मिळून मिसळून खेळणे गप्पा मारणे जमले नाही, कोणत्याही बाळाचा मायेने पापा घेण्याचं सुख त्यांना अनुभवता आलं नाही, चिमुकल्या पावलांना शाळेची वाट दाखवनं तर खूपच दूरची गोष्ट आहे.

त्यांना जमलं फक्त सहनशीलतेचा करूनेचा स्वाभिमानाचा सागर असणाऱ्या कांताला छळणं हाड उगाळून जा कांतीन त्यांचा संसार फुलवला टिकवला तिच्या डोळ्यात कायम अस्व भरण्याखेरीज सुखाचा एक क्षण हे कधी तिच्या आसपास फिरकू दिला नाही. आजही अशा अनेक कांता बाई परी परिस्थितीच्या अंधकारक भविष्याचा दीपस्तंभ होऊन उभ्या आहेत पुरुषाच्या साठी शिवाय त्यांच्या अत्याचाराला सहन करत आपला संसार रथ समर्थपणे हाकत आहेत या सर्व रणरागिनींना सलाम....

चंदनासम झिजवून 
घर त्यांचं फुलवते 
स्वतःच पेरून अस्तित्व
बीज तुमचंच खुलवते.

Durga Deshmane Raut
सौ. दुर्गा देशमाने राऊत,
माजलगाव, जि. बीड.