कथालेखन स्पर्धेत थोरात प्रथम, द्वितीय राजपूत व गायके तर तृतीय रसाळ व पवार

तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पहात असतो, ऐकत असतो. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे  पूर्वीसारखा हळवा, नाती जपणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, माणूस आज काल हरवलाय.

कथालेखन स्पर्धेत थोरात प्रथम, द्वितीय राजपूत व गायके तर तृतीय रसाळ व पवार

न्याय देणारा संवाद समुहातर्फे नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडली जाते. तसेच समाजात घडणाऱ्या विविध घटनांना आपण दररोज उघड्या डोळ्यांनी पहात असतो, ऐकत असतो. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे  पूर्वीसारखा हळवा, नाती जपणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा, माणूस आज काल हरवलाय. आज घडणाऱ्या विविध घटनांमध्ये अतिशय असंवेदनशील, स्वार्थी, लंपट, वासनांध माणसे आपल्याला दिसतात. ज्यांच्याबद्दल आपण शब्दात वर्णन करू शकत नाहीत. म्हणूनच समुहातर्फे जेष्ठ कवयित्री तथा स्तंभलेखिका श्रीमती. जयश्री औताडे (गंगाखेड जि. परभणी) यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा चन्ने यांनी तीन दिवशीय कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागातील दहा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात सर्वांनीच अप्रतिम अशा कथा लिहिल्या. 

आयोजक : बाबा चन्ने

स्पर्धेच्या परिक्षक म्हणून औरंगाबादच्या बनसोड एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका तथा प्राचार्या सौ. कल्पना रविंद्र बनसोड या असून त्यांनी स्पर्धेत प्रथम सौ. संगीता थोरात (नवी मुंबई), व्दितीय सौ. मीना ब. राजपूत (कल्याण), व कु. कावेरी आबासाहेब गायके (भिवगाव, ता. वैजापूर) तर तृतीय सोनाली रामलाल रसाळ (कापूसवाडगाव, ता. वैजापूर) व सौ. पल्लवी राहूल पवार (गंगापूर) अशाप्रकारे निकाल घोषित केला.

परिक्षक : प्राचार्या. कल्पना रविंद्र बनसोड

तसेच स्पर्धेत पुढील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात प्रामुख्याने सौ. प्रिती सुरज भालेराव (पुणे), सौ. मालती पाटील (डोंबिवली), कु. स्वाती नानासाहेब जाधव (लासूरगाव, ता. वैजापूर), सौ. नीता यशवंत भामरे (नासिक) व सौ. जयश्री अविनाश जगताप (सातारा) यांचा महत्वाचा सहभाग होता.

प्रतिक्रिया 

१ ) न्याय देणारा संवाद या समुहाच्या माध्यमातून मला अनेक विषय शिकायला भेटले. समुहाचे आदरणीय बाबा चन्ने यांच्या माध्यमातून माझे लेखन विविध दैनिकातून प्रसिद्ध होऊ लागले. स्पर्धेत क्रमांक येवो अथवा न येवो हे महत्वाचे नसून समुहाच्या माध्यमातून लिहायला प्रोत्साहन मिळते हा खुप महत्वाचा विषय आहे. माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखिकांना समुहामुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले हा खरच वाखाणण्याजोगा विषय आहे. 

प्रिती भालेराव, पुणे (स्पर्धक)


२) न्याय देणारा संवाद' या समूहात सहभागी होणाऱ्या साहित्यक्षेत्रात नवोदित साहित्यिकांना लिहिण्याची संधी दिल्याबद्दल प्रमुख समूह प्रशासक बाबा चन्ने सरांचे मनस्वी आभार. समूहात सहभागी साहित्याच्या वारकरींना समूहात वेगवेगळ्या विषयांवर उपक्रम, स्पर्धा आयोजित करून साहित्य वारी घडवून आणतात. त्यामुळे नवनवे साहित्य प्रकारांची ओळख होण्याबरोबरच त्यांच्या लेखणीला धार लागण्याचे कार्यही घडते.

मालती पाटील, डोंबिवली