बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था,महाराष्ट्र संचालित रंगीन काव्यधारा साहित्य कला मंच,महाराष्ट्र चौथे वर्धापन दिनानिमित्त खुले काव्यसंमेलन,संपादित तेजस्विनी बिऱ्हाडे यांचे "आवाज स्पंदनातील प्रातिनिधिक" काव्यसंग्रह" तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २६/१२/२०२१ सारडा धर्मशाळा,आळंदी येथे आयोजित केले होते. यावेळी कवियित्री पूनम सुलाने यांना कोषाध्यक्ष तेजस्विनी बिऱ्हाडे तसेच सचिव भूषण बिऱ्हाडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्यक्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक, मित्रपरिवार तसेच समाजातील उच्च अधिकाऱ्यांनी कवियित्री पूनम सुलाने यांचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
