देशाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते भावनांचा कल्लोळचे प्रकाशन संपन्न

वैजापूर शहरात पुस्तक प्रकाशन समारंभासाठी प्रामुख्याने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड साहेब यांच्यासह औरंगाबाद पूर्वचे आमदार तथा माजी. मंत्री अतुलजी सावे, बालविकास महामंडळाचे मा. अध्यक्ष प्रवीणजी घुगे...

देशाचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते भावनांचा कल्लोळचे प्रकाशन संपन्न

वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील ग्रामीण साहित्यिक बाबा चन्ने यांनी संपादित केलेल्या 'भावनांचा कल्लोळ' या कथासंग्रहाचे प्रकाशन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड साहेब यांच्या हस्ते वैजापूर शहरात नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी देशाच्या हिताचे लेखन करणाऱ्या साहित्यिकांची एक फळी निर्माण करा असा सल्ला देखील त्यांनी बाबा चन्ने यांना दिला. 

बाबा चन्ने यांनी आतापर्यंत हिदुस्थानचे वीरपूत्र महाराणा प्रतापसिंह (चरित्र), शिक्षणमहर्षी विनायकराव पाटील (चरित्र), यशाचे रहस्य (व्यक्तीमत्व विकास) रंग प्रीतीचे (संपादित  प्रेमकथा) तसेच नुकतेच प्रकाशित झालेले 'भावनांचा कल्लोळ' (हे मानवी मनातील भावनांच्या आंदोलनांवर आधारित संपादकीय पुस्तक) असे एकुण पाच पुस्तके प्रकाशित असून त्यांनी विविध नामांकित वर्तमानपत्रातून आतापर्यंत विपुल लेखन केलेले आहे. 

औरंगाबाद येथील 'वर्ड लॅन्ड पब्लिशिंग हाऊस' या प्रकाशन संस्थेने  प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहात खालील एकुण २१ नवोदित लेखक लेखिकांच्या २३ कथा असून त्यात प्रामुख्याने संपादक बाबा चन्ने औरंगाबाद, सहसंपादिका अर्पणा माने कोल्हापूर, सुनिल रामचंद्र पवार मुंबई, गोविंद श्रीमंगल लातूर, अतिश म्हात्रे अलिबाग, रेश्मा पवार मुंबई, प्रा. राजाराम यशवंत मलगुंडे सांगली, जयश्री अविनाश जगताप सातारा, उज्वला पवार जळगाव, सरोजा मनोहर गायकवाड लातूर, नागसेन तुळसे हिंगोली, प्रतिमा अरूण काळे पुणे, डाॅ. गोविंद पांडूरंग चौधरी नांदेड, सरिता उध्दव भांड-खराद पैठण, संजीवनी सदानंद इंगळे, औरंगाबाद, जयाबाई विनायकराव घुगे-मुंडे बीड, सुधीर पाटोळे पुणे, राहुल साहेबराव सोळस वैजापूर, दर्शन जोशी संगमनेर, पंडितराव वराडे औरंगाबाद, मारोती मोतीराम कुळसंगे शेगाव बुलढाणा अशाप्रकारे महाराष्ट्रातील विविध भागातील लेखक लेखिकांनी कथासंग्रहासाठी लेखन केलेले आहे.

तसेच या कथासंग्रहाची प्रास्थावना थोर हिंदी साहित्यिक तथा सिनेअभिने नाना पाटेकर यांचे माणसपूत्र राधेश्यामजी गोमला यांनी लिहिलेली असून मुखपृष्ठ शशांक पाटील यांनी काढलेले आहे. 

वैजापूर शहरात पुस्तक प्रकाशन समारंभासाठी प्रामुख्याने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड साहेब यांच्यासह औरंगाबाद पूर्वचे आमदार तथा माजी. मंत्री अतुलजी सावे, बालविकास महामंडळाचे मा. अध्यक्ष प्रवीणजी घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष औताडे, मा. जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, मा. नगराध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डाॅ. दिनेश परदेशी, हेडगेवार बॅंकेचे चेअरमन प्रशांत कंगले, दुध संघांचे मा. चेअरमन डी.के. अण्णा, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, तालुका अध्यक्षा कल्पना पवार, भाजपा नेते नारायणराव कवडे, डाॅ. विपीन साळे, भाजपा विस्तारक ज्ञानेश्वर आदमणे, नबी पटेल, मा. जि.प. सदस्य सुनिल पैठणपगारे, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, ज्ञानेश्वर जगताप, कैलास पवार, मा. तालुकाध्यक्ष नारायण तुपे उद्योगपती मोहनराव आहेर, राजू चव्हाण, संतोष मिसाळ, दत्तू भाऊ हिरे, विश्वनाथ मंत्री, सुनिल जिवरख, संतोष आवारे, प्रभाकर कराळे यांच्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील तसेच वैजापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर मंडळी, तसेच वैजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक व नगरसेविका पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित होते.