कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण ज्ञानदीप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण महाराष्ट्र बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था वाशिम महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत देण्यात येणारा तेजभूषण ज्ञानदिप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण ज्ञानदीप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण महाराष्ट्र बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था वाशिम महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत देण्यात येणारा तेजभूषण ज्ञानदिप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


पुनम सुलाने ह्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद मधील गोकुळवाडी या छोट्याशा गावातल्या असून सध्या राहण्याचे ठिकाण हैदराबाद आहे. पुनम सुलाने यांची साहित्य क्षेत्रातील ओळख आता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नसून देशातील अनेक राज्यातील प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्रातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात तसेच USA च्या साप्ताहिक पत्रिकेतून देखील त्यांच्या या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहे.

पुनम सुलाने यांना आतापर्यंत ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त असून त्यापैकी 2021 मध्ये विक्रमशिला हिंदी विद्यापीठ गांधिनगर भागलपुर (बिहार) प्रादेशिक शाखा महाराष्ट्र यांच्यातर्फे हिंदी साहित्यात विशेष कामगिरीबद्दल कविरत्न या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर कलानगरी वेल्फेअर सोसायटी अमरावती द्वारा देखील कविरत्न पुरस्कार 2021 त्यांना प्राप्त झाले असून त्यांच्या  साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आता त्यांना दिल्या जाणाऱ्या तेजभूषण ज्ञानदीप राज्यस्तरीय पुरस्काराची सर्व स्तरातून चर्चा होत आहे.

सुलाने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून विविध ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमात त्या नेहमी भाग घेत असतात. विविध दिवाळी अंकातून लेखन तसेच मासिक पत्रिकेत देखील त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. सोशल मीडिया वरती त्यांच्या हिंदी मराठी कविता, लेख, चारोळी यांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद नेहमीच मिळत असतो. तेजभूषण ज्ञानदिप राज्यस्तरीय पुरस्काराची निवड झाल्याबद्दल  अनेक मान्यवर साहित्यिकांनी, तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी पुनम सुलाने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.