वर्ल्डस् वूमन आयकॉन - शिल्पा पूनीत सिन्हा

आपण किती मोठे झालो, यापेक्षा आपण किती जनांना मोठं केलं, असा प्रेरणा देणारा लेख

वर्ल्डस् वूमन आयकॉन - शिल्पा पूनीत सिन्हा

आपण किती मोठं झालो, यापेक्षा आपण किती लोकांना मोठं केलं, हे मला नेहमीच महत्वाचे वाटतं. नुसतं शिक्षण घेतलं म्हणजे आपलेल्या सरकारी नोकरी लागेलच, असे नाही. योगायोगाने सरकारी नोकरी लागली तर आपण काम कसं करतो, हे सर्वांनाच माहीत आहे. सरकारी नोकरीला फाटा देत स्वतःचं शैक्षणिक आणि सिनेसृष्टीत साम्राज्य उभं करणारं महाराष्ट्रातील एक व्यक्तीमत्व म्हणजे शिल्पा पूनीत सिन्हा-देवकर. 

shipa sinha

त्या कोल्हापूर शहरातील रहिवासी असून स्वतः इंजिनियर आहेत. त्यांनी जुलै २००० मध्ये 'रेलीश इन्फोसॉफ्ट' या संस्थेची स्थापना केली. आज रेलीशचा वटवृक्ष झाला असून संपूर्ण देशात रेलीशच्या ५२ शाखा कार्यरत आहेत. आजपर्यंत ह्या संस्थेतून ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ग्राफिक्स, ॲनिमेशन, आणि व्हीएफएक्सचे शिक्षण देऊन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी दिली आहे. आज ते विद्यार्थी लाखो रूपये मासिक पगार कमवतात. ही खूप विशेष बाब म्हणावी लागेल. रेलीशला नॅशनल आणि इंटरनॅशनल असे अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच संस्थेने देशभर नावलौकिक कमावला आहे.      

चित्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरातच २०१८ ला 'व्हीएफएक्स' स्टुडिओ सुरू केला, स्टुडिओच्या माध्यमातून कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील विविध भागातील मुलांना अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी व्हीएफएक्सचे काम करायची संधी मिळवून दिली. तान्हाजी, टोटल धमाल, माऊली, ८३ (कपिल देव), ओडियन, आर.आर.आर. अशा १०० हून अधिक चित्रपटांचे काम शिल्पा सिन्हा-देवकर यांच्या माध्यमातून झाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आर.आर.आर. या सिनेमातील 'नाटू नाटू' या गीतावर भारतीयांनीच नव्हे तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांनी ताल धरला. अन् देशाला नाटू नाटू या गीताच्या माध्यमातून पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठा 'ऑस्कर पुरस्कार' मिळाला. त्यात सर्वात मोलाचे योगदान हे शिल्पा सिन्हा-देवकर यांच्या 'रेलीश कंपनी'चेच आहे. महाराष्ट्रायीन स्त्री काय करू शकते, हे या गीताच्या माध्यमातून परत एकदा सिध्द झाले. तसेच शेकडो युवक युवतीचे सिनेसृष्टीत काम करण्याचे स्वप्न देखील सिन्हा मॅडममुळेच शक्य झाले. 

shilpa sinh award

वरील सर्व कामाचा आढावा घेऊन फेब्रुवारी Global Triumph Foundation तर्फे शिल्पा सिन्हा-देवकर यांना 'वर्ल्डस् वूमन आयकॉन - २०२२' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिल्पा सिन्हा-देवकर या सुसंस्कृत, सुस्वभावी, भावनिक व्यक्तीमत्व असून त्या एक उत्तम लेखिका आणि कवयित्री देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो लेख आणि कविता देखील लिहिलेले आहेत. तसेच ते महाराष्ट्रातील विविध नामांकित दैनिकांनी प्रसिद्ध देखील केलेले आहे. त्या न्याय देणारा परिवाराच्या सदस्या देखील आहेत.

baba channe

बाबा चन्ने,
धोंदलगाव, ता. वैजापूर