मूर्खासारखं पैसा वाचवण्याचा प्रयत्न करू नका

काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही.

मूर्खासारखं पैसा वाचवण्याचा प्रयत्न करू नका

एका माणसाला न्यायाधीशांसमोर लाच घेण्याच्या आरोपावरून आणण्यात आलं. न्यायाधीशांनी त्याला कोणती शिक्षा भोगायची, हे त्यालाच निवडायला सांगितलं. एक तर पाच किलो कांदे खा, किंवा पन्नास फटके कोरड्याचे मारले जातील, किंवा एक हजार रुपये दंड भर. तो लोभी कैदी त्याचा पैसा खर्च करायला तयारच नव्हता, त्यामुळे त्याने तो पर्याय अर्थातच टाळला. जर पन्नास फटके कोरड्याचे खावेत, तर ते पूर्ण होईपर्यंत जीवंत राहणार नाही, हे नक्की! त्यामुळे त्याने कांदे खाण्याची शिक्षा निवडली. पण दोनपेक्षा जास्त कांदे त्याला खाता येईना, म्हणून त्याने ती शिक्षा अर्धीच सोडली. पण जेव्हा कोरड्याचे फटके बसू लागले तेव्हा दहा फटके बसेपर्यंतच तो ती चिरून जाणारी वेदना सहन करू शकला, मग रडू लागला. "मला वाचवा, मी वाटल्यास दंड भरतो, वाटल्यास तुम्ही म्हणाले तेवढे भरतो.' अशा रीतीने त्या मूर्ख माणसाने काही पैसा वाचवण्यासाठी तीनही शिक्षांची चव पाहिली.

काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही. पैसा तुम्हाला उत्तेजना विकत घेऊन देऊ शकतो, पण आनंद विकत घेऊ शकत नाही. पैसा तुम्हाला ब्यूटीपार्लरमध्ये घेऊन जाऊ शकतो, पण सौंदर्य नाही देऊ शकतः पैसा औषध आणून देऊ शकतो, पण पूर्णपणे आरोग्य नाही. तुम्हाला कसरत करण्यासाठी चांगली उपकरण आणून देऊ शकतो, पण तुम्हाला चांगली शारीरिक क्षमता नाही मिळू शकत. तुम्ही एक चांगलं अन्त्यवत्र विकत घेऊन शकता, पण याची तुम्हाला खात्री नाहीच देता येणार की तुम्हाला चांगला आणि शांततेने मृत्यू येईल.